छत्रपती संभाजीनगर : जी-20निमित्त काही रस्ते चकाचक करण्यात आले होते. परंतु इतर रस्त्यांची अवस्था वाईट आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात केली जाणारी रस्त्यांची कामे थंडबस्त्यात पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कामे होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ३१७ कोटी रुपयांची तरतूद करुन १०७ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील करण्यात आली. परंतु डॉ. अभिजित `चौधरी यांनी `स्मार्ट सिटी` च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे स्वीकारल्यावर त्यांनी आर्थिक तरतुदींचा आढावा घेऊन रस्त्यांच्या कामाची संख्या घटवली. सुरुवातीला कंत्राटदाराला २२ रस्त्यांची कामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता ४४ रस्त्यांची कामे करण्यास सांगितले. `स्मार्ट सिटी` च्या निधीतून ६६ रस्त्यांची कामे होतील असे त्यांनी स्पष्ट केले.
कामांना गती नाही
रस्त्यांची कामे घटवल्यामुळे १४ कंत्राटदाराकडून कामाची गती धिमी केल्याचे बोलले जात आहे. कामाची गती वाढवून लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करा असे `स्मार्ट सिटी` ने कंत्राटदाराला कळवले पण त्यानंतरही कामांना गती आलेली नाही. त्यामुळे डॉ. चौधरी यांनीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिकारी व कंत्राटदाराची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. बैठक घेवून अधिकारी व कंत्राटदाराच्या अडचणी जाणून घेतल्या जातील असे त्यांनी नमूद केले.
रस्त्यांची कामे...
आता ४४ रस्त्यांची कामे करण्यास सांगितले. `स्मार्ट सिटी` च्या निधीतून ६६ रस्त्यांची कामे होतील असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची कामे घटवल्यामुळे १४ कंत्राटदाराकडून कामाची गती धिमी केल्याचे बोलले जात आहे. कामाची गती वाढवून लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करा असे `स्मार्ट सिटी` ने कंत्राटदाराला कळवले पण त्यानंतरही कामांना गती आलेली नाही.